नियमित बस सेवा
पुणे व पिंपरी चिंचवड शहराची 'नियमित बससेवा' ही या दोन्ही शहर हद्दीमध्ये धावणारी मुख्य वाहतूकीची सेवा आहे. दररोज १० ते ११ लाख प्रवाशांची ने-आण करणे हे सर्व पुणेकरांसाठी सर्वात हक्काची व विश्वासाची वाहतूक व्यवस्था आहे. सकाळी ०५.३० ते रात्रौ १२.०० वा. पर्यंत सर्वात व्यस्त मार्गावर पीएमपीएमएमएल च्या बसेस त्यांच्या वक्तशीरपणा व कार्यक्षम सेवेसाठी ओळखल्या जातात. सध्या ३८९ मार्गावरून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात ४० किमीचा परीघ व्यापताना पीएमआरडीए हद्दीपर्यंत सेवा पोहचलेल्या आहेत. तसेच वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सुचनांच्या आधारे व शहरवस्तीच्या लोकसंख्येचा अभ्यास करून विस्तारांच्या योजना आखल्या जातात व नव्याने कार्यान्वित करण्यात येतात. सुमारे १६६० शेड्यूलद्वारे २१९१६ ट्रिपांचे आजरोजी बस प्रवासासाठी दैनंदिन नियोजन केलेले असून अंदाजे ९६ टक्के संचलन सक्षमपणे प्रवाशांना सेवा देत आहेत यासाठी नियमित बस मार्गाच्या वेळापत्रकास आवश्य भेट द्या.