इंद्रधनुष्य बस सेवा
- इंद्रधनुष्य बीआरटी बससेवा ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहर हद्दीमध्ये ७ बीआरटी मार्गांमधून ७१९ बसेस व्दारे ११७ मार्गावर सेवा देत आहे. बस रॅपीड ट्रान्झीट, इंद्रधनुष्य ही सेवा पीएमपीएमएल व्दारे संचलित असलेली सर्वात जलद, सुरक्षित, किफायतशीर आणि आरामदायी मास ट्रान्झीट पर्याय आहे. इंद्रधनुष्य वाहतूक एकात्मीक नेटवर्क देतात ज्यामध्ये पुणे मनपा व पिंपरी-चिंचवड मनपा या दोन्ही कार्यक्षेत्राचा समावेश होतो. शहरातील वाढत्या वाहतूक भारमानावर नियंत्रण ठेवताना आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास उपलब्ध करून देताना पीएमपीएमएलने शहरातील प्रदुषणाची तिव्रता कमी होण्यासाठी फक्त सीएनजी व इलेक्ट्रीक बीआरटी बसेस संचलनात ठेवलेल्या आहेत.
बीआरटी कॉरीडॉर खालील प्रमाणे,
- पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांचा शाश्वत शहरी वाहतूक प्रकल्प (एस यु टी पी) हा भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाचा पुढाकार आहे तसेच जागतिक बँक, युएनडीपी आणि जीइएफ यांचेही या बीआरटी प्रकल्पाला समर्थन मिळालेले आहे.
अधिक माहितीसाठी इंद्रधनुष्य बीआरटी बस मार्गाच्या वेळापत्रकास भेट द्या.
अ.क्र. | कॉरीडॉर | अंतर | एकुण बीआरटी बस थांबे |
---|---|---|---|
१ | सांगवी फाटा ते रावेत | १४.५० कि.मी. | २१ |
२ | संगमवाडी ते विश्रांतवाडी | ०८ कि.मी. | ०९ |
3 | नाशिक फाटा ते वाकड | ०८ कि.मी. | १४ |
४ | येरवडा ते आपलेघर | १३.कि.मी. | १३ |
५ | निगडी ते दापोडी | १२ कि.मी. | अप १८ व डाऊन १८ एकूण ३६ |
६ | स्पाईन रोड चिखली ते काळेवाडी | ६.८० कि.मी. | १४ |
७ | कात्रज ते स्वारगेट | ६.१०कि.मी. | ११ |