PMPML

रातराणी बसेस

ही आमची सेवा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी समर्पित आहे. मध्यरात्री येणाऱ्या एसटी बसेस, रेल्वे यांनी येणाऱ्या बाहेरील शहरातील प्रवाशी तसेच रात्रौपाळी करणाऱ्या हॉस्पीटल, विविध आयटी संस्था, कंपन्या, हॉटेल्स इ. मधील कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष प्रवाशांच्या सुरक्षितलेला व सुविधांना प्राधान्य देऊन केली आहे या व्यवस्थेचा तिकिट दर सव्वापट असून रात्रौ ११.४५ ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत ही सेवा एक तासाच्या वारंवारितेने देण्यात येत आहे. ज्यामध्ये नियमित बससेवा सुरू होणे आणि बंद होण्याच्या दरम्यानचा कालावधी समाविष्ठ आहे. सदर मार्ग पीएमपीएमएलने निश्चित करताना गर्दीची/मागणीची घनता योग्य रित्या लक्षात ठेवली आहे. सध्या या बसेस कात्रज, हडपसर, पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, एनडीए गेट, वाघोली, निगडी औध मार्गे, निगडी वाकडेवाडी मार्गे व भोसरी या मुख्य स्थानकावरून संचलित आहे. अधिक माहितीसाठी रात्रीच्या बस मार्गाच्या वेळापत्रकाला भेट द्या.

रात्रीच्या बस मार्गाच्या वेळापत्रक