PMPML

पुणे दर्शन वातानुकुलित बस सेवा

निसर्ग सौंदर्यासाठी असो किंवा ऐतिहासीक प्रेक्षणीय स्थळासाठी देश विदेश, राज्यातून येणा-या पर्यटकांना विविध स्थळे दाखविण्यासाठी पीएमपीएमएल कडून बससेवा बऱ्याच वर्षापासून देण्यात येत आहे. यामार्फत सांस्कृतिक वारसाचा प्रसार व बळकटीकरण पीएमपीएमएल मार्फत होत आहे. इच्छुक प्रवासी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे पास बुक करू शकतात. सदर ऑनलाईन बुकींग प्रवासाच्या आदल्या दिवशी १२.०० वा. बंद होते. या सेवेचे प्रस्थान स्थळ पुणे स्टेशन व डेक्कन जिमखाना असून येथून सहल सुरू होण्याची वेळ सकाळी ०८.३० वा आहे तर सहल संपण्याची वेळ संध्याकाळी १८.१० वा आहे. पुणे दर्शन मध्ये पाहता येणारी पर्यटन स्थळे खालील प्रमाणे. १. केसरीवाडा २. शनिवारवाडा ३. लालमहाल ४. श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिर बाह्यदर्शन ५. आगाखान पॅलेस ६. आदिवासी वस्तु संग्रहालय ७. युध्द भूमी/नॅशनल वॉर मेमोरीएल सदन कमांड एरिया ८. शिंदे छत्री ९. राजीव गांधी प्राणी संग्रहालय १०. सारसबाग गणपती मंदिर ११. महालक्ष्मी मंदिर बाह्य दर्शन १२. पु. ल. देशपांडे उद्यान १३. केळकर संग्रहालय १४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय १५. चतुश्रृंगी माता मंदिर व १६. इस्कॉन मंदिर कोंढवा रोड. प्रती व्यक्ती तिकिट दर रुपये ५००/- असून बुकींगसाठी भेट द्या पुणे दर्शन अधिक माहितीसाठी पुणे दर्शन वेळापत्रकाला भेट द्या.

पुणे दर्शन वेळापत्रक