PMPML

शाळेची बस

  • पीएमपीएमएल शैक्षणिक उद्देशासाठी प्रवेश देण्यासाठी वचन बद्ध आहे. पीएमपीएमएल शाळेत ये-जा करत असताना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेते. अशा प्रकारे बसेस सरकारी, महामंडळ व खाजगी शाळांना घेऊन जाण्यासाठी कंत्राटी तत्वावर बस दिल्या जातात. या बसेस शाळांच्या वेळापत्रकानुसार सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०६.०० पर्यंत धावतात. पालकांचा विश्वास संपादन केलेली ही सेवा पीएमपीएमएल भविष्यात अधिकाधीक शाळांसोबत सहाकार्य करून या सेवेचा विस्तार करण्यास उत्सुक आहे.

बस भाड्याने घ्या (प्रासंगिक करार)

  • लग्न असो, सहल असो किंवा व्यावसायिक सहली असो, आरामदायी वाहतूक पुरवण्यासाठी पीएमपीएमएल सदैव तयार असते. सर्वात विश्वासार्ह पद्धतीने बसेस भाड्याने घेतल्या जाऊ शकतात. ह्या बसेस भाड्यावर उपलब्ध करताना तासाची संख्या, प्रवासी अंतर यानुसार भाडे आकारले जाते.
  • संपर्क साधा: ०२०-२४५०३३००