PMPML

महिलांसाठी विशेष बस सेवा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नोकरी व इतर कामांकरिता प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मुक्त व सुरक्षित जागा 'महिलांसाठी विशेष' बससेवा देऊ शकल्याबद्दल पीएमपीएमएलला अभिमान वाटतो. महिला प्रवास करताना त्यांची सुरक्षितता व सोई सुनिश्चीत करण्यासाठी यामध्ये पीएमपीएमएल चा पुढाकार आहे. यासाठी निश्चित केलेले बसमार्ग, सर्वाधिक गर्दी, त्याची घनता व व्यस्तता पाहून निश्चित केलेले आहे. या समर्पित मार्गावरील गर्दीच्या वेळेस महिलांसाठी विशेष बससेवेच्या खेपा सुनिश्चित करून दिलेल्या आहेत.