एकेरी मार्ग परतीचा प्रवास
Route Ids
{{data.route_id}}
Bus Stops
{{data.stop_name}}
Routes
{{data.source}}-{{data.destination}}
From
{{data.stop_name}}
To
{{data.stop_name}}
Bus Stops
{{data.stop_name}}
माझ्या बसचा मागोवा घ्या

नियमित बसेस

पुणे व पिंपरीचिंचवडशहरामधील नागरिकांसाठी सुरक्षित व सक्षम वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ हे अत्यंत महत्वाचे कार्य पार पाडत आहे. पुणे शहरात दररोज सरासरी १२ लाख प्रवाशांची सकाळी ५.३० वा. पासुन ते मध्यरात्री पर्यंत अनेक मार्गावर सुरक्षितपणे व नियोजित वेळापत्रका प्रमाणे अत्यंत कार्यक्षमतेने काम करण्यामुळे पुणेकरांच्या विश्वास संपादन केलेला आहे. सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील सुमारे 20 कि.मी.  परिघातमधील विविध मार्गावर सेवा देण्यात येत आहे. भविष्यामध्ये कार्यक्षेत्र वाढविण्याचे नियोजन चालु आहे. सरासरी दररोज १९२३ बसेसद्वारे ३०१९ मार्गावर २१२१८ खेपांद्वारे प्रवाशांची वाहतुक केली जाते. 


अधिक माहितीसाठी पहा नियमित बसेसचे मार्गावरील वेळापत्रक

रेनबो बसेस

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत रेनबो बी.आर.टी. (बस रॅपीड ट्रान्सीट सिस्टीम) बससेवा ही जलद, सुरक्षित, स्वस्त, आरामदायी, बससेवेचा पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. रेनबो बसेसचे जाळे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पसरलेले असून या स्वतंत्रबस मार्गामुळे विना अडथळा, विना विलंब, जलद व सुरक्षित सेवा प्रवाशांना देण्यात येते. या मार्गावरील बसेसमुळे शहरातील प्रदुषण कमी होण्यास मदत होते.


सध्या सुरू असलेले ४ मार्ग • औंध ते रावेत

 • संगमवाडी ते विश्रांतवाडी

 • नाशिक फाटा ते वाकड

 • येरवडा ते वाघोली


एकुण 4 बीआरटीरेनबोमार्गावरद्वारे 39 मार्गांवर 326 बसेसकार्यरतआहेत.


रेनबो बी.आर.टी. हा प्रकल्प स्वस्तात सुरक्षित व आरामदायीपणे असानागरिकांना उपलब्ध होणेकामी जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत राबविण्यात आला आहे.या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सस्टेनेबल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एसयुटीपी) अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हल्पमेंट कडुन निधी उपलब्ध करून देण्यात आला तसेच हा प्रकल्प वल्र्ड बॅक, युएनडीपी व जीईएफ यांच्या पाठबळामुळे कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.


अधिक माहितीसाठी पहाः रेनबो बसेस मार्गांचे वेळापत्रक

रात्र बसेस

शहरामधील ज्या नागरिकांचे रात्रभर कामकाज चालुच असते. अशांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे. पी.एम.पी.एम.एल.तर्फे नेहमीच प्रवाशांचे सुरक्षित व त्यांचे सोईप्रमाणेच सेवा देण्याचे नियोजन करण्यात येते. ७ बसेसचा ताफा ज्याला रातराणी असे नाव देण्यात आलेले असून ही सेवा शहरातील ७ मार्गावर रात्रभर कार्यान्वित असते. शहरातील ज्या मार्गांवर रात्रभर वर्दळ असते. अशा मार्गावर रातराणीची सेवा देण्याचे नियोजन केलेले आहे. सध्या खालील प्रमाणे मार्गावर रातराणी सेवा देण्यात येते. • कात्रज ते शिवाजीनगर (रात्रसेवा १)

 • कात्रज ते पुणे स्टेशन (रात्रसेवा २)

 • हडपसर ते स्वारगेट (रात्रसेवा ३)

 • हडपसर ते पुणे स्टेशन (रात्रसेवा ४)

 • पुणे स्टेशन ते निगडी मार्गे औंधगांव, डांगे चौक (रात्रसेवा ६/१)

 • पुणे स्टेशन ते कोंढवा गेट (रात्रसेवा ९/१)

 • पुणे स्टेशन ते वाघोली (रात्रसेवा ९/१)


अधिक माहितीसाठी पहा रात्र बसेस मार्गांचे वेळापत्रक

पुणे / पिंपरी चिंचवड़ दर्शन बसेस

पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे नैसर्गिक सौंदर्य व ऐतिहासिक स्थळे यामुळे दरवर्षी बरेचसे पर्यटक आकर्षित होऊन पुणे व पिंपरी चिंचवड शहरास भेट देतात. पी.एम.पी.एम.एल. तर्फे पर्यटकांचे शहरातील वास्तव्य महत्वपूर्ण व संस्मरणीय ठरावे यासाठी पुणे दर्शन व पिंपरी चिंचवड दर्शन या उपक्रमाचे नियोजन केलेले आहे.


पर्यटनांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारची तिकीटे आरक्षित करण्याची व्यवस्था केलेली असून ऑनलाईन सेवेमध्ये मध्यरात्री १२.०० वा. पर्यंत दुसऱ्या दिवशीचे तिकीट आरक्षित करू शकतात. तसेच ऑफलाइन तिकीट बस सुटण्याच्या ठिकाणाहूनही आरक्षित करता येते.


पुणे दर्शन या उपक्रमा अंतर्गत दोन वातानुकूलित बसेसद्वारे १४ सांस्कृतिक, ऐतिहासिक, प्रेक्षणिय स्थळे दाखविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. केसरी वाडा, शनिवार वाडा, केळकर संग्रहालय, चतुश्रुंगी मंदिर, जोशी रेल्वे संग्रहालय, पु ल देशपांडे उद्यान, सारस बाग, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, शिंदे छत्री, यूद्ध मूर्ती, आगाखान पॅलेस, बालाजी मंदिर/ बनेश्वर/ कोंढणपुर, फिल्म इस्टीट्यूट प्रभात रोड, सचिन तेंडुलकर क्रिकेट संग्रहालय. सदर बस पुणे स्टेशन व डेक्कन जिमखाना येथून सुटते. प्रती प्रवासी तिकीट दर रु.५००/-


पिंपरी चिंचवड दर्शन – १, मध्ये आयकॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चाफेकर वाडा, चाफेकर बंधू स्मारक, विज्ञान पार्क, बर्ड व्हॅली, देहुगाव (मंदिर), देहू गाथा मंदिर, अप्पूघर / दुर्गा टेकडी अशी १० ठिकाणे आहेत. सदर बस निगडी येथून सुटते. प्रती प्रवासी तिकीट दर रु.५००/-


पिंपरी चिंचवड दर्शन – २, मध्ये शिवृष्टी, सायन्स पार्क, चाफेकर बंधू स्मारक, मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चाफेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पूघर / दुर्गा टेकडी, बर्ड व्हॅली, आळंदी अशी १० ठिकाणे आहेत. सदर बस भोसरी येथून सुटते. प्रती प्रवासी तिकीट दर रु.५००/-.


आरक्षित करण्यासाठी पहा - पुणे/ पिंपरी चिंचवड दर्शन

विमानतळ बसेस

पुणे शहराचा विस्तार व विकास झपाट्याने होत असल्याने विविध प्रकारच्या कामकाजा निमित्त अनेक नागरिक बाहेरगावाहुन शहरांमध्ये येत व जात असतात अशा नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने त्यांचे प्रवासाचे नियोजन पीएमपीएमएल कडून करण्यात येते. एअरपोर्ट बसेस या उपक्रमा अंतर्गत एअरपोर्ट पासून वातनुकूलीत आरामदायी बसेसना प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. वातानुकूलीत बससेवा फारच कमी वेळात लोकप्रिय झालेली असून बरेच प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत या बसेस विमानतळ ते हिंजवडी माण फेज-3 यामार्गावर 2 तास वारंवारीतेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या मार्गावरील वातानुकूलीत बसेसचे तिकिट ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध केलेले आहे. एअरपोर्ट स्पेशल बस सव्र्हीस ताफ्यामध्ये एकुण 2 बसेस असून त्या हिंजवडी ते विमानतळ अशा सोडण्यात येतात या बससेवेची वाढती लोकप्रियता म्हणजेच पीएमपीएमएल च्या चांगल्या प्रवासी सेवेची पावतीच असून ही सेवा अधिक चांगली व वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.


अधिक माहितीसाठी पहा विमानतळ बसेस मार्गाचे वेळापत्रक आणि विमानतळ बसेस मार्गाचे दरपत्रक

महिला विषेश

पुणे शहरातील महिलांना स्वतंत्र आणि सुरक्षीत बस सेवा देण्यास सक्षम असल्याबद्दल पुणे शहराचा अभिमान आहे. पण ही गोष्ट पीएमपीएमएल च्या सहभागाशिवाय शक्य नव्हती.ज्यावेळस महिला बसमधून प्रवास करतात त्यावेळेस त्यांची सुरक्षितता व विश्वासअर्हता यांनाच प्रथम प्राधान्य देण्यात येते. ज्या मार्गावर खास महिलांसाठी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत असे मार्ग क्रमांक खालील प्रमाणे. • मार्ग क्र. २ कात्रज ते शिवाजीनगर

 • मार्ग क्र. २४ कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड / समतानगर

 • मार्ग क्र. ८२ वारजे माळवाडी ते मनपा भवन

 • मार्ग क्र. १११ भेकराईनगर ते मनपा भवन

 • मार्ग क्र. १२३ म.न.पा. भवन ते निगडी
पुणे शहरामधील महिलांना त्यांचे इच्छीत स्थळी सुरक्षीत पोहचण्यासाठी ही सेवा सकाळी व सायंकाळी कार्यान्वीत असते. सध्या महिला स्पेशल ६ बसेसचा ताफा ५ मार्गावर सकाळी ९.०० ते सायंकाळी ०५.५५ कार्यरत असतो ह्या सेवेला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता पीएमपीएमएल तर्फे भविष्यात लवकरच आणखी बसेस मध्ये वाढ करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी पहा महिला विषेश मार्गांचे वेळापत्रक

पास / मी कार्ड

पीएमपीएमएल तर्फे विविध प्रकारचे पासेस प्रवाशांसाठी जसे नियमित प्रवास करणारे स्वातंत्र्य सैनिक, अंध, अपंग यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे पासेस पुणे व पिंपरी चिंचवड मधील अनेक बसस्थानकांवर असलेल्या पास केंद्रातून देण्याची व्यवस्था केलेली आहे.


प्रवाशांचे सोयीसाठी हे पासेस वार्षिक, मासिक, आठवड्याचे असे अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच अंध, अपंग, जेष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक यांना सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.


अधिक माहितीसाठी पहा पास / मी सेंन्टर / पास or ऑनलाइन पास करा (दुवा)

पीएमपी ई कनेक्ट

आपल्या वेळेचे महत्व लक्षात घेता पीएमपीएमएल स्वतःच तंत्रज्ञानातील जाणकार बनला आहे. आता आपण वेळेत आपला प्रवास सोयिस्कररित्या आखू शकतात फक्त आपल्या मोबाईलवर क्लिक करून आमचा अ‍ॅप डाऊनलोड करून आपण प्रवासी मार्ग निश्चित करा व याच बरोबर आपण सुचना किंवा तक्रारीही नोंदवू शकता.


विशेष बस सेवा

#

इलेक्ट्रिक बसेस

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) यांच्या सहयोगाने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) ताफ्यात इलेक्ट्रिक बस सुरू केल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित, प्रदूषणमुक्त,ध्वनिविरहित आणि प्रवाशांना आरामदायक प्रवास देणार्‍या आहेत.


अधिक माहितीसाठी पहा इलेक्ट्रिक बसेसचे मार्गावरील वेळापत्रक