Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Rainbow BRT

पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी शाश्वत बस सेवा म्हणून रेनबो (इंद्रधनुष्य) जलद बस सेवा विकसित करण्यात आलेली आहे. पुणे व पिंपर चिंचवड शहरातील व्यापक मोबिलिटी योजनेसाठी जलद बस सेवा विकसित करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण, रहदारी, खाजगी वाहनांची संख्या व लांबचा प्रवास हे वाढत्या शहराचे महत्वाचे पैलू आहेत. उच्च प्रतीची सार्वजनिक वाहतूक सेवा असणे हे लोकांच्या आरोग्य व जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीची पायाभूत सुविधा असलेली सेवा निर्माण करण्याची गरज ओळखून सोयीस्कर व माहिती तंत्रज्ञान अशी एकत्रित सुरक्षित, स्वस्त व जागतिक दर्जाची जलद बस सेवा (बी. आर. टी) आणली आहे. त्यामुळे शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल होत आहे.

बी. आर. टी जलद बस सेवा हा उत्तम पर्याय आहे..

  • बी. आर. टी हि लवचिक प्रणाली आहे.

  • बी. आर. टी ही उत्तम वाहतूक प्रणाली असून इतर कोणत्याही वाहतूक सेवेपेक्षा कमी खर्चात बांधली जाऊ शकते

  • बी. आर. टी ही जास्त क्षमतेचे प्रवासी वाहू शकते

  • लेवल बोर्डिंग सुविधेमुळे प्रती प्रवासी बोर्डिंगचा वेळ ४ सेकंदापासून ०.४ सेकंद इतका कमी झाला आहे.

  • सुरक्षित, वेगवान, स्वस्त आणि अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध आहे.

सदरचा रेनबो (इंद्रधनुष्य) बी. आर. टी प्रकल्प जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन (JNNURM) भारत सरकारच्या आर्थिक पाठींब्याने राबविली जात आहे. याव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील प्रकल्प हा विशिष्ट घटक शाश्वत नागरी परिवहन प्रकल्प ' , भारत नगरविकास, सरकारच्या पुढाकाराने आहे आणि जागतिक बँक, यूएनडीपी आणि GEF द्वारे समर्थीत आहे ज्या अंतर्गत अनुदानीत आहे.