Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

आमच्या विषयी

पीएमपीएमएल चा इतिहास पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड

सन १९४० मध्ये पुण्यामध्ये नगरपालिका होती. पुण्यामध्ये सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करून त्याची बातमी पुण्यामध्ये सर्व ठिकाणी पसरली. या बातमीला सर्व टांगेवल्यानी विरोध केला व ४ दिवस संपावर गेले. त्यानंतर त्यावेळेच्या जिल्हाधिकारी यांनी सदर संपाबाबत वरिष्ट स्तरावर पत्र व्यवहार केला. त्यानंतर त्यावेळेच्या शासनाने सन १९४० मध्ये पुण्यामध्ये बससेवा सुरू करण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार मे. सिल्वर जुबली मोटर यांचेमार्फत २ जुन १९४० साली खालील ४ मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली.

 1. स्वारगेट ते पुणे स्टेशन

 2. स्वारगेट ते शिवाजीनगर

 3. लकडीपूल ते जुना पुलगेट (कॅम्प)

 4. पुणे स्टेशन ते लकडी पूल (डेक्कन)

तसेच या सर्व बसेस पेट्रोलवर चालणा-या होत्या. १९४१ ते १९४८ या वर्षात खालीलप्रमाणे बसेस होत्या.

वर्ष

बसेस

वर्ष

बसेस

१९४१

२०

१९४५

३८

१९४२

२६

१९४६

४२

१९४३

३०

१९४७

४५

१९४४

३८

१९४८

४६

या बस सेवेमध्ये बस प्रवासासाठी प्रती मैलासाठी एक आणा (६ पैसे) असा दर होता. सन १९५९ मध्ये अंतर मोजण्यासाठी मैल ही प्रक्रिया बंद करून किलोमीटर पद्धतीने अंतर मोजणे सुरू झाले. तसेच आणा हे पैसे मोजण्याचे बंद होऊन रुपये या पद्धतीत सुरू झाले. कामगारांना चहा भत्ता २ आणे म्हणजे ६ पैसे इतका होता. सदरची बस सेवा १९४२ ते १९५० पर्यंत चांगल्याप्रकारे सुरू होती. मे. सिल्वर जुबली मोटर कंपनीने सदरची बस सेवा बंद करण्याबाबत त्यावेळेच्या सरकारला कळविले. त्यानंतर १५ फेब्रुवारी १९५० रोजी पुणे नगरपालिकेचे रूपांतर महानगर पालिकेत झाले व १५ फेब्रुवारी १९५० पासून पुणे महानगर पालिका अस्तित्वात आली.

त्यानंतर १५ दिवसात पुणे महानगर पालिकेने १ मार्च १९५० रोजी पुणे महानगर परिवहन उपक्रम (पी एम टी) स्थापन करून सुरू केली व सिल्वर जुबली कडील सर्व बसेस व सर्व सेवक वर्ग पी एम टी मध्ये वर्ग केला. पी एम टी सुरू करताना २२ जुन्या बसेस व ३५ नवीन बसेस अश्या ५७ बसेसच्या ताफ्याने बस सेवा सुरू केली. यासाठी १५ लाखाचे कर्ज (बोण्ड्स) पुणे महानगर पालिकेने उभे केले. या बसेस १४ मार्गावर सुरू करण्यात आल्या. सुरूवातीला या बसेस लहान कप्सिवीच्या म्हणजेच १४ सीटर होत्या व त्यानंतर २२ सीटर बसेस घेण्यात आल्या.. कमीत कमी भाडे 5 पैसे होते नंतर पुणे दर्शन आरामदायी बस सेवा सुरू करण्यात आली यास 12 वर्षाच्या आतील मुलास रूपये 1 तर प्रतिप्रौढ व्यक्तीस रूपये 2 असा दर होता. 1960 साला नंतर बसचा ताफा 135 इतका होता बसमध्ये उभे राहण्यास परवानगी नव्हती सन 1951 नंतर सरकारने याला परवानगी दिली

पिंपरी -चिंचवड नगरपालिकेची स्थापना दिनांक 4 मार्च 1970 रोजी करणेत आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिवहन विभागाची स्थापना (पीसीएमटी) दिनांक 04 मार्च 1974 रोजी झालेली आहे पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ सद्याचे भाजी मंडईचे जागेत पिंपरी बस डेपो होता परिवहन विभागाची सुरवात 8 बसेसने झाली या सर्व बसेस टाटा मेकच्या होत्या याबसेस सुरवातीला मार्ग क्रं101 (पिंपरीगांव ते भोसरी) व मार्ग क्रं 301 (चिंचवड गांव ते भोसरी) या मार्गावर धावत होत्या. सन 1988 साली सद्याचे गव्हाणे वस्ती भोसरी स्थानकाजवळील पिंपरी-चिंचवड मनपा चे जागेत दुसरा डेपो सुरू करणेत आला नंतर हा डेपो धावडे वस्ती, भोसरी येथे रूपांतरीत करणेत आला त्यावेळी पीसीएमसी चे ताफ्यात 101 बसेस संचलनात होत्या. त्यावेळी 13 मार्ग व 45 शेड्युल होते पीसीएमसी महानगरपालिकेची 1991 चे जनगणनेनुसार लोकसंख्या 5,17,083 झालेने पर्यायाने बसेस संख्येत व डेपो मध्ये वाढ करणे गरजेचे असल्याने दिनांक 29/8/1998 रोजी निगडी आगाराची स्थापना करणेत आली त्यावेळी पिंपरी डेपोतून 30 ते 15 भोसरी डेपोतून 40 व निगडी डेपोतून 70 ते 75 बसेस मार्गावर जात होत्या सरासरी मार्गावर 130 ते 140 बसेस मार्गावर होत्या व एकुण बसेसची संख्या 850 चे आसपास होती 1997 साली राजगुरूनगर ते पुणे स्टेशन हा नविन बस मार्ग सुरू करणेत आला एकुण कर्मचारी संख्या 2100 होती.

पुणे शहराचे ऐतिहासिक महत्व असल्याने व पुण्यामध्ये शैक्षणिक दर्जा तसेच निरनिराळे खेळ यासाठी पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर तसेच ऐतिहासिक महत्व असलेले पुणे म्हणून ओळखले जाते. या पुण्याचे ऐतिहासिक नामकरण सुदधा आहे. कसब पुन, पुनवडि, पुना, पुणे, पुणे महानगर पालिका अश्या पद्धतीने ओळख पुण्याची आहे. पुण्यातील नद्या, बागा, किल्ले, धरणे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यापीठ वेगवेगळी कला, कौशल्य, नाटक, सीतेचा थिएटर आणखी सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे शहराची ओळख पेन्शनर ही पुणे म्हणून ओळखली जाते. तसेच पुण्यामध्ये आता नव्याने आय. टी. कंपन्या स्थापन झाल्या असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन प्रवाश्यांचा सुरक्षित प्रवास होण्यासाठी बी.आर.टी. संकल्पनेत राबविण्यास सुरुवात झाली आहे. पहिला बी.आर.टी. पाइलट प्रोजेक्ट ३ डिसेंबर २००६ साली कात्रज ते हडपसर, दूसरा बी.आर.टी. पाइलट प्रोजेक्ट ३० ऑगस्ट ते २०१५ साली संगमवाडी ते विश्रातवाडी, तिसरा बी.आर.टी. पाइलट प्रोजेक्ट ५ सप्टेंबर २०१५ साली औंध, सांगावी ते किवळे सुरू करण्यात आली. पिंपरी चिंचवड मध्ये दुसरी, पुणे महानगर पालिका हद्दीमध्ये या बी.आर.टी. बसेसचे अत्याधुनिक (इलेक्ट्रॉनिक्स) पद्धतीची माहिती सुरू करण्यात आली. यामध्ये बस स्टॉप, बस थांब्याची नावे, वेळापत्रक, जाहिराती तसेच सोशल मेसेजिंग अश्या पद्धतीचा अवलंब यात करण्यात आलेला आहे. परिवहन महामंडळाची वेबसाइट नव्याने सुधारित करण्याचे कामकाज सुरू झाले असून पहिला टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे.

सन १९६१ नंतर पुणे शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. याचे कारण म्हणजे खडकवासला व पानशेत धरण फुटल्याने पुण्यावर नैसर्गिक आपत्ति मोठ्या प्रमाणावर आले होती. त्यामुळे पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. याचे प्रमुख कारण म्हणजे परिवहन उपक्रमाची बस सेवा करणीभूत ठरली. पिंपरी, चिंचवड आद्धोगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी कारखाण्यांना बस सेवा देण्याचे काम पी. एम. टी. ने केले. टेल्को, बजाज व अन्य कारखान्यातील कामगारांना बस सेवा देण्याचे काम पी. एम. टी. ने केले. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी या ठिकाणाचा विकास होण्यास परिवहन महामंडळाची सेवा प्रमुख करणीभूत आहे. पी.एम.पी.एम.एल. तर्फे सध्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह उपनगरांमध्ये बस सेवा सुरू असून दररोज सरासरी ११ ते ११,५०,००० प्रवासी प्रवास करतात. सध्याची परिवहन महामंडळाचा बस ताफा २०५० असा आहे. सध्या दोन्ही शहराची लोकसंख्या ५५ ते ६० लाखांच्या आसपास आहे. परिवहन महामंडळाकडे सध्याचा सेवक वर्ग १०,५०० आहे. पी.एम.पी.एम.एल. कडे सध्या एकूण १३ आगार आहेत व ३७६ बस मार्ग आहेत. प्रमुख ५० स्थानके आहेत. परिवहन महामंडळाची सेवा सन १९५० ते आजपर्यंत सुरू आहे. या बस सेवेचा फायदा नोकरदार, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, उपनगरातील नागरिक, व्यवसाय करणारे अनेक दुकानदार, पुणे शहराला भेट देणारे नागरिक यांना आजतागायत बस सेवेचा लाभ मिळत आहे. पी.एम.पी.एम.एल. ची स्थापना खालील प्रमाणे झालेली आहे.

१९ आक्टोंबर २००७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील अध्यादेशानुसार पी.एम.पी.एम.एल. कंपनी अॅक्ट खाली स्थापन करण्यात निर्णय दिनांक १९/०७/२००७ रोजी नोंदणी करण्यात आली. दिनांक १९/१०/२००७ रोजी कंपनी कायद्याखाली पी.एम.पी.एम.एल. चा कारभार सुरू करण्याचा दाखला प्राप्त झाला व दिनांक १६/१२/२००७ रोजी प्रत्यक्ष एकत्रिकरणाची प्रक्रिया होऊन कारभार प्रत्यक्षात सुरू झाला. पी.एम.पी.एम.एल. कंपनी अॅक्ट मध्ये नोंदणी करण्यापूर्वि पी.एम.टी. व पी.सी.एम.टी. हे दोन परिवहन उपक्रम पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे होते. दोन्ही महानगर पालिकेला बी.पी.एम.सी. अॅक्ट लागू आहे. त्यानुसार पूर्व पी.एम.टी. व पूर्व पी.सी.एम.टी लाही बी.पी.एम.सी. अॅक्ट लागू होता. पूर्व पी.एम.टी. ची स्थापना १ मार्च १९५० ल झाली तर पूर्व पी.सी.एम.टी. ची स्थापना ४ मार्च १९७६ रोजी झाली व पी.एम.पी.एम.एल. ची स्थापना कंपनी अॅक्ट खाली दिनांक १९/१०/२००७ साली झाली.

पुणे महानगर पालिकेचे ६० टक्के भाग भांडवल, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे ४० टक्के भाग भांडवल पी.एम.पी.एम.एल. चे आहे. पी.एम.पी.एम.एल. स्थापनाची अधिकृत नोंदणी १९/१०/२००७ रोजी झालेली आहे. पी.एम.पी.एम.एल. चे संचालक मंडळातील सदस्य संख्या १३ आहे. सध्या संचालकमध्ये खालीलप्रमाणे पदनामे आहेत.

 1. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, (भा.प्र.से)

 2. मा. महापौर पुणे महानगरपालिका

 3. मा. महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 4. मा. अध्यक्ष स्थायी समिति, पुणे म.न.पा.

 5. मा. अध्यक्ष स्थायी समिति, पिंपरी चिंचवड म.न.पा.

 6. मा. महापालिका आयुक्त, पुणे म.न.पा.

 7. मा. महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड म.न.पा.

 8. मा. सदस्य, पुणे म.न.पा.

 9. मा. संचालक (सीआयआरटी)

 10. मा. अध्यक्ष, रस्ते वाहतूक विकास संचालक

 11. तज्ञ संचालक (मानव संसाधन.)

 12. तज्ञ संचालक (वित्त)

 13. तज्ञ संचालक (वाहतूक)

परिवहन महामंडळाचे प्रमुख ३ विभाग आहेत. . वाहतूक २. वर्कशॉप ३. प्रशासन. सध्या परिवहन महामंडळाकडे खालील अधिकारी प्रमुख पदे कार्यान्वित आहेत.

 1. सहव्यवस्थापकीय संचालक

 2. मुख्य कार्यकारी अधिकारी

 3. महाव्यवस्थापक (संचलन व अभियांत्रिकी)

 4. मुख्य लेखा व वित्त अधिकारी

 5. मुख्य अंतर्गत अर्थान्विंक्षक

 6. वाहतूक व्यवस्थापक(संचलन )

 7. मुख्य अभियंता

 8. वाहतूक व्यवस्थापक (कमर्शिअल)

 9. स्थापत्य अभियंता

 10. भांडार अधिकारी

 11. प्रशासन अधिकारी

 12. कामगार व जनता संपर्क अधिकारी

भविष्य काळातील योजना

१. परिवहन महामंडळाच्या बस ताफ्यात नवीन बसेस खरेदी करणे.

२. नवीन आगार, बस स्थानके सुरू करणे. यासाठी जागा ताब्यात घेणे.

३. नवीन बस मार्ग सुरू करणे.

४. बी.आर.टी. मार्ग पी.एम.सी. व पी.सी.एम.सी. परिसरात सुरू करणे.

५. सुधारित संकेत स्थळ

६. आय.टी.एम.एस. यंत्रणा बी.आर.टी. मध्ये सुरू करणे.

७. ८. आय.टी. वातानुकूलित बस सेवा.

९. एयरपोर्ट पासून दोन्ही शहरात वातानुकूलित बस सेवा.

१०. भांडार विभागाचे कामकाजाच संगणकीय प्रणालीमध्ये करणे.

११. पास विभागाचे अत्याधूंनीकरण, ऑनलाइन पासेसचा प्रयत्न.

१२. पी.एम.पी.एम.एल. चे अ‍ॅप्स तयार करणे. यामध्ये पी.एम.पी.एम.एल. सर्व माहिती, मार्गाची माहिती, अनुषंगिक माहिती उपलब्ध होणार.

१३. आस्थापणा आराखडा, आकृतीबंध, पदोन्नती, सेवानियम, स्थायी आदेश, सेवाजेष्ठता ची कामे पूर्ण करणे, पदोन्नती देणे व अनुषंगिक कामे करणे.